राशी आणि मानवाच्या गमतीजमती

मकर ही राशी चक्रातील दहाव्या क्रमांकाची रास. मकर म्हणजे परिश्रम , खडतर प्रवास. त्याचप्रमाणे शोभावे म्हणून मगर या राशीचे बोधचिन्ह आहे. मगरा प्रमाणे टणक, खडबडीत पाठीची असते , त्याचप्रमाणे मकर राशीच्या लोकांचा प्रवास खडतर असतो. चिंता तर या राशीच्या पाचव्याला पुजली आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मकर च्या व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो.

मकर राशीचे लोक हे उंच, सडसडीत, नीटस नाक डोळे असलेले , तसेच चेहऱ्यावर खूप काही सोसल्याचे किचित भाव असलेले असतात. कुठलाही कार्यक्रम असो, पण मकर राशीच्या व्यक्तींना उत्साह खूप असतो, त्या मग नीटनटून जाणार. या व्यक्ती बुद्धिवान नसल्या तरी अतिशय श्रध्द्ळू असतात. एकदा जर शेवटचे दोन महिने अभ्यास करून दुसरा येत असेल तर हे वर्षाच्या पाहिल्या दिवसा पासून अभ्यास करून पहिला क्रमांक काढतात. यात त्यांना आनंद मिळतो.

Advertisements

राशी आणि स्वभावाच्या गमतीगमती

राशीचक्रातील नवव्या क्रमाकावर येणारी रास म्हणजे धनु रास. वरचे अर्धे शरिर मानवाचे आणि खालचे अर्धे शरीर घोड्याचे शरीर आणि हातात धनुष्यबाण घेतलेले असे याचे बोधचिन्ह आहे. या राशीच्या लोकांना बुद्धीचे वरदान मिळाले आहे . तसेच खालील अर्धे शरीर घोड्याचे असल्याने याच्याकडे ताकद आणि निरोगी व्यक्तिमत्व असते. बोलताना जिभेवर सरस्वती वीणा वाजवते. या राशीच्या व्यक्ती एकदी प्रामाणिक असतात आणि या भाबड्या, श्रद्धाळू असतात. मदतीला धावून जातात्त बर्याचवेळा अह्कारी असतात .

यांचा गुरु हा स्वामी असल्याने हे खूप बुद्धिवान आणि ताकदवान असतात. यांना प्रखर बुद्धी असते. हे खूप प्रामाणिक असतात त्यामुळे यांना फसवणूक अजिबात आवडत नाही असे जाल्यास ते खूप राग धरून टेवतात. व यांकडे ताकदअसल्याने अंगी रंगीटपण सुद्धा येते

स्वभाव राशीचा गमतीजती मानवाच्या

मंगळ अधिपती असलेलली आठवी रास वृश्चिक. ही रास स्थिर तत्व ची असून ही स्त्री राशी आहे. वृछिक राशीच्या व्यक्ती महत्वकांक्षी , जिद्दी आणि स्पर्धा त्मक आहे. वृश्चिक राशीच्या स्त्रिया आकर्षक व्यक्तिमत्वच्या असतात. या स्त्रिया किंचित लालसर असतात आणि यान कडे पुरुषांना आकर्षित करणारे दुर्मिळ आणि मादक अशी ताकद असते. या राशीचे पुरुष सुद्धा बांधेसूद आणि आकर्षक असतात. या राशीचे लोक नेहमी सरकारी असो वा परीशा’ या मध्ये नेहमी झळकतात. तसेच व्यवसाय आणि बाकी मध्ये चांगली कामगिरी करतात. 

 

वृश्चिक राशीच्या व्यक्ती नेहमी स्वःतच्या प्रगती कडे लश्य देतात. मग वाटेत अडथळा बनू  पाहणाऱ्या व्यक्तींना बाजूला काडतात’.  या राशीचे लोक अहोरात्र मेहनत घेण्याची ताकद टेवतात. यांकडे आव्हाने पेलण्याची ताकद असते, तसेच या लोकना पर्क्यास्त्री ची कोतूक  सहन होत नाही . घरातील सगळी सूत्र त्याकडे राहाविऊ असे त्यांना वाटत असत. हे मुलांचा साभाळ खूप प्रमाने करतात. त्यांना शिस्त लावणे , संस्कार देणे हे जास्त महत्वाचे त्यांना वाटते.       

राशी आणि त्यामधील गमतीजमती

राशी चक्रातील सातव्या क्रमांकाची रास म्हणजे तूळ रास. या राशीकडे संयमीपणा आणी धीरोदात्तापणा आहे. तूळ राशीचे बोधचिन्ह तराजू आहे. हा तराजू म्हणजे समतोलपणा…
कोणावर ही अन्याय न होउन देणारा आणि सर्वाना समान मोलात मोजणारा अशि ही तूळ रास. एकीकडे यांच्या कडे संयमीपण आणि अश्या गोष्टी असल्या तरीही हे दुसर्या बाजूने खूप रसिक, तर कोणत्याही गोष्टी मध्ये आनंद घेण्याचा स्वभाव
वस्तूमध्ये सुंदरता शोधतात.खूप काम करून एकदि व्यक्ती रसिकता कमी होते पण याची रसिकता तसीच कायम राहते. आणि हे सगळ्या गोष्टी मधून आनंद घेतात.

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राची प्रसन्नता , कोमलता , नाजुकपणाया सर्व तूळ राशीच्या व्यक्ती मध्ये पहाण्यास मिळतात.मध्यम वर्ण , छान बांधा, आकर्षक डोळे, चमकदार केस, आणि नितळ कांती ही तूळ राशीच्या व्यक्तीची गुणधर्म.
वृषभ राशीचा स्वामी देखिल शुक्र आहे. पण वृषभ राशी मध्ये असणारे आणि तूळचे गुणधर्म खूप वेगळे असतात. तुळ राशीची व्यक्ती आणि वृषभ च्या व्यक्तीची तुलना केली असता यातील लोक हे हळूहळू सर्व गोष्टीचा आस्वाद घेतात.

राशी आणि स्वभाव यांच्या गमतीजमती

राशीचक्रातील सहाव्या क्रमांकावर येणारी रास म्हणजे कन्या.ही स्त्री राशी असून द्वीसभाव, वेश्य तत्वाची रास आहे. कन्या राशीच्या व्यक्ती समजूतदार, सहनशील, तडजोड करणाऱ्या असतात. कन्या राशीच्या व्यक्ती आपला फायदा बघून माणसे जोडतात. ओळखी वाढवतात. त्यांच्या मते एखादे महत्वाचे काम होणार असेल किवा भविष्यात होणार असेल त्यासाठी तरतूद म्हणून योग्य पावले उचलतात. बोलक , विनोदी स्वभाव , मुस्तद्दी स्वभाव , पण हसत हसत दुसऱ्याच्या वरमा वर बोट ठेवतात.
सहज बोललेले वाक्य माणसाच्या मनात दोन अर्थ निर्माण करतात आणि बोललेल्या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यावा याचा विचार सोमारच्या व्यक्तीने करावा.

कन्या राशीच्या स्वामी बुध आहे. कन्या राशीच्या व्यक्ती दिसायला साधारण पण डोळ्यात एक मिश्किल झाक असते. तसेच या व्यक्ती त्यांच्या सध्याच्या वयापेक्षा पाच ते दहा वर्षांनी लहान वाटतात. चेहऱ्यावर जून किवा प्रौढ पणा नाही. विनोदी असतात. सहज जाता जाता एखाद्या ची फिरकी घेतात. अगदी खूप पांडित्य नसलं तरी हजार जबाबी पणा , वेळ मारून नेता येते.

कन्या राशीचे पुरुष
कन्या राशीचे पुरुष हे मध्यम उंचीचे, मध्यम बांधा , हसरे, खोडकर भाव असलेले विनोदी , तसेच बोलक्या स्वभावाचे असतात. कन्या राशीचे पुरुष खाण्या पिण्याच्या बाबतीत अगदी शोकिन असतात. आजूबाजच्या परिसथितीनुरूप अंदाज घेत बदलत असतात. नोकरी , व्यवसाय सर्व करून घरातील काम सुद्धा ते करतात. आणि यांचे मित्र परिवार ही खूप असतो. कन्या राशीचे पुरुष हे अगदी चिकित्सा करणारे असतात.
एखद्या गोष्टीचे पूर्ण विश्लेषण करतात. तपशील घेतात. पण द्वीधा मन स्थिठीमंधे अडकल्याने ते विचार करत राहतात. आणि वेळ निघून जातो. धाडसाला लक्ष्मी माळ घालते हे त्यांना पटत नाही.

कन्या राशीच्या स्त्रिया…
कन्या राशीच्या स्त्रिया संसारासाठी एकदी योग्य जोडीदार असतात. या खूप काटकसरीने, स्वच्छ तेची आवड असलेले , स्वयांनपाकात निपुण , मुलांच छान संगोपन करणाऱ्या असतात. या स्त्री या पतीपरायनं असतात. सासू सासरे यांचा मान राखतात. तसेच या खूप हुशार आणि काटक असतात. या पती कसाही असला तरी चार चौघात कोणाला समजून देत नाहीत. एकंदरीत या सुंदर पत्नी , गृहिणी, आणि सजक माता ठरतात.

राशी आणि स्वभावाच्या गमतीजमती

राशीचक्रातील पाचवी राशी म्हणजे सिंह. सिंह ही रास अतिशय स्थिर व पुरुषी रास आहे. रवी तिचा स्वामी असून ती अत्यंत स्वाभिमानी, तत्वनिष्ठ, प्रामाणिक, शूर आणि बाणेदार असते. भेदक नजर , भव्य कपाळ, मध्यम बांधा व मध्यम उंची , नाक जरासे रुंद , हट्टी स्वभावाचे असतात. सर्वानमध्ये यांना मान मिळावा आणि सर्वांन मध्ये याचा दरारा असावा असे याचा स्वभाव असतो.

मोडेन पण वाकणार नाही असे हे सिंह राशीचे. खूप त्वत आणि त्यावर चालणारी व्यक्तिमत्व असतात . मित्रांना आणि आप्तेष्टांना मदत करतात. कुणी अडचणीत असेल तर त्याला जाऊन मदत करणार, अश्या प्रकारचे दानशूर, तत्वनिष्ठ असे सिंह राशीचे लोक असतात. सिंह रास ही राशीचक्रातील १२ राशीचे भूषण रास आहे. या राशीच्या व्यक्ती अतिशय धाडसी, बेफिकीर, निरोगी’, तेजस्वी असतात. सिंह या राशीच बोधचिन्ह असल्याने एकदी धाडसी आणि कोणत्याही आजाराशी लढण्याची ताकद यामध्ये असते. यांकडे बाळ, चिकाटी, प्रतिकारशक्ती खूप असते. रवी हा या राशीचा स्वामी असल्यांने तेज यामधून प्रतीत होत.

राशी आणि स्वभाव यातील गमतीजमती

राशी चक्रातील ४ थ्या वर येणारी रास म्हणजे कर्क. अत्यंत संवेदशील , तरळ हळुवार मनाची रास. चंद्र यांचा स्वामी आहे, अशी हळव्या मनाची रास कर्क. कर्क राशी चे कोणीही असो ते मनाने नाजूक , हळुवार , संवेदनशील , प्रेमळ , दयाळू असते. कर्क राशी चे नेहमी दुसऱ्या बद्दल जास्त विचार करतात. ते दुसऱ्या चा भावनांचा विचार करतात , त्याला जपतात आणि स्वप्न विश्वात जगत असतात. कर्कशपणा, ओबड धोबड पणा , भांडखोर पणा, स्वार्थी पणा या राशीत सापडणार नाही. ते सगळ्याची ममता, प्रेम याने खूप काळजी घेतात. प्रेमाने सगळ्यांशी वागतात. आणि त्यांना जप तात. हे लोक आक दी नाजूक असतात आणि यांना साथीच्या आजारांनी किवा कोणता ही आजार लगेच होतो. यांना प्रतिकार करण्याची ताकद आधी पासून च कमी असते त्यामुळे यांचा स्वभाव अकडी साधा व न प्रतिकार करणार असतो. जेवण बनवणे , घरातील काम करणे यांना पसंद असते. तसेच यांना मित्रपरिवार आणि भावंडे याबरोबरच प्रवास करणे खूप आवडते. त्यामुळे हे खूप परिवार किवा त्या परिवार मध्ये राहणे पसंद करतात. कर्क राशीचे लोक खूप हळवे असतात त्यामुळे त्यांना गरिबांना किवा ज्यांना कोणीही मदत करत नाही त्यांना मदत करणे आणि त्याच्या साठी काम करण्याची सतत सवय असते. हे लोक त्यांना मदत करणे आणि त्याचा साठी काम करणं आणि त्यांना मदतीचा हात देणं पसंद करतात. कर्क रास ही भावनिक आहे. या राशीचे बोध चिन्ह खेकडा असले तरी या राशीच्या स्वभाव अगदी वेगळा आहे.