राशी आणि स्वभाव यांच्या गमतीजमती

राशीचक्रातील सहाव्या क्रमांकावर येणारी रास म्हणजे कन्या.ही स्त्री राशी असून द्वीसभाव, वेश्य तत्वाची रास आहे. कन्या राशीच्या व्यक्ती समजूतदार, सहनशील, तडजोड करणाऱ्या असतात. कन्या राशीच्या व्यक्ती आपला फायदा बघून माणसे जोडतात. ओळखी वाढवतात. त्यांच्या मते एखादे महत्वाचे काम होणार असेल किवा भविष्यात होणार असेल त्यासाठी तरतूद म्हणून योग्य पावले उचलतात. बोलक , विनोदी स्वभाव , मुस्तद्दी स्वभाव , पण हसत हसत दुसऱ्याच्या वरमा वर बोट ठेवतात.
सहज बोललेले वाक्य माणसाच्या मनात दोन अर्थ निर्माण करतात आणि बोललेल्या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यावा याचा विचार सोमारच्या व्यक्तीने करावा.

कन्या राशीच्या स्वामी बुध आहे. कन्या राशीच्या व्यक्ती दिसायला साधारण पण डोळ्यात एक मिश्किल झाक असते. तसेच या व्यक्ती त्यांच्या सध्याच्या वयापेक्षा पाच ते दहा वर्षांनी लहान वाटतात. चेहऱ्यावर जून किवा प्रौढ पणा नाही. विनोदी असतात. सहज जाता जाता एखाद्या ची फिरकी घेतात. अगदी खूप पांडित्य नसलं तरी हजार जबाबी पणा , वेळ मारून नेता येते.

कन्या राशीचे पुरुष
कन्या राशीचे पुरुष हे मध्यम उंचीचे, मध्यम बांधा , हसरे, खोडकर भाव असलेले विनोदी , तसेच बोलक्या स्वभावाचे असतात. कन्या राशीचे पुरुष खाण्या पिण्याच्या बाबतीत अगदी शोकिन असतात. आजूबाजच्या परिसथितीनुरूप अंदाज घेत बदलत असतात. नोकरी , व्यवसाय सर्व करून घरातील काम सुद्धा ते करतात. आणि यांचे मित्र परिवार ही खूप असतो. कन्या राशीचे पुरुष हे अगदी चिकित्सा करणारे असतात.
एखद्या गोष्टीचे पूर्ण विश्लेषण करतात. तपशील घेतात. पण द्वीधा मन स्थिठीमंधे अडकल्याने ते विचार करत राहतात. आणि वेळ निघून जातो. धाडसाला लक्ष्मी माळ घालते हे त्यांना पटत नाही.

कन्या राशीच्या स्त्रिया…
कन्या राशीच्या स्त्रिया संसारासाठी एकदी योग्य जोडीदार असतात. या खूप काटकसरीने, स्वच्छ तेची आवड असलेले , स्वयांनपाकात निपुण , मुलांच छान संगोपन करणाऱ्या असतात. या स्त्री या पतीपरायनं असतात. सासू सासरे यांचा मान राखतात. तसेच या खूप हुशार आणि काटक असतात. या पती कसाही असला तरी चार चौघात कोणाला समजून देत नाहीत. एकंदरीत या सुंदर पत्नी , गृहिणी, आणि सजक माता ठरतात.

Advertisements

राशी आणि स्वभावाच्या गमतीजमती

राशीचक्रातील पाचवी राशी म्हणजे सिंह. सिंह ही रास अतिशय स्थिर व पुरुषी रास आहे. रवी तिचा स्वामी असून ती अत्यंत स्वाभिमानी, तत्वनिष्ठ, प्रामाणिक, शूर आणि बाणेदार असते. भेदक नजर , भव्य कपाळ, मध्यम बांधा व मध्यम उंची , नाक जरासे रुंद , हट्टी स्वभावाचे असतात. सर्वानमध्ये यांना मान मिळावा आणि सर्वांन मध्ये याचा दरारा असावा असे याचा स्वभाव असतो.

मोडेन पण वाकणार नाही असे हे सिंह राशीचे. खूप त्वत आणि त्यावर चालणारी व्यक्तिमत्व असतात . मित्रांना आणि आप्तेष्टांना मदत करतात. कुणी अडचणीत असेल तर त्याला जाऊन मदत करणार, अश्या प्रकारचे दानशूर, तत्वनिष्ठ असे सिंह राशीचे लोक असतात. सिंह रास ही राशीचक्रातील १२ राशीचे भूषण रास आहे. या राशीच्या व्यक्ती अतिशय धाडसी, बेफिकीर, निरोगी’, तेजस्वी असतात. सिंह या राशीच बोधचिन्ह असल्याने एकदी धाडसी आणि कोणत्याही आजाराशी लढण्याची ताकद यामध्ये असते. यांकडे बाळ, चिकाटी, प्रतिकारशक्ती खूप असते. रवी हा या राशीचा स्वामी असल्यांने तेज यामधून प्रतीत होत.

राशी आणि स्वभाव यातील गमतीजमती

राशी चक्रातील ४ थ्या वर येणारी रास म्हणजे कर्क. अत्यंत संवेदशील , तरळ हळुवार मनाची रास. चंद्र यांचा स्वामी आहे, अशी हळव्या मनाची रास कर्क. कर्क राशी चे कोणीही असो ते मनाने नाजूक , हळुवार , संवेदनशील , प्रेमळ , दयाळू असते. कर्क राशी चे नेहमी दुसऱ्या बद्दल जास्त विचार करतात. ते दुसऱ्या चा भावनांचा विचार करतात , त्याला जपतात आणि स्वप्न विश्वात जगत असतात. कर्कशपणा, ओबड धोबड पणा , भांडखोर पणा, स्वार्थी पणा या राशीत सापडणार नाही. ते सगळ्याची ममता, प्रेम याने खूप काळजी घेतात. प्रेमाने सगळ्यांशी वागतात. आणि त्यांना जप तात. हे लोक आक दी नाजूक असतात आणि यांना साथीच्या आजारांनी किवा कोणता ही आजार लगेच होतो. यांना प्रतिकार करण्याची ताकद आधी पासून च कमी असते त्यामुळे यांचा स्वभाव अकडी साधा व न प्रतिकार करणार असतो. जेवण बनवणे , घरातील काम करणे यांना पसंद असते. तसेच यांना मित्रपरिवार आणि भावंडे याबरोबरच प्रवास करणे खूप आवडते. त्यामुळे हे खूप परिवार किवा त्या परिवार मध्ये राहणे पसंद करतात. कर्क राशीचे लोक खूप हळवे असतात त्यामुळे त्यांना गरिबांना किवा ज्यांना कोणीही मदत करत नाही त्यांना मदत करणे आणि त्याच्या साठी काम करण्याची सतत सवय असते. हे लोक त्यांना मदत करणे आणि त्याचा साठी काम करणं आणि त्यांना मदतीचा हात देणं पसंद करतात. कर्क रास ही भावनिक आहे. या राशीचे बोध चिन्ह खेकडा असले तरी या राशीच्या स्वभाव अगदी वेगळा आहे.

राशी सांगे स्वभाव

मिथुन रास

राशीचक्रातील तिसऱ्या क्रमांकाची बुध जिचा स्वामी आहे, अशी मिथुन रास. बोलक्या स्वभावाचे चुणचुणीत, हुशार हजरजबाबी असतात. पण आकर्षक रूपाच्या या व्यक्ती सर्वाना आवडतात. या व्यक्ती राशी प्रमाणे भाषण , वाद विवाद , लिखाण , वाचन यात रस असतो. त्याचबरोबर यांना खेळ, व्यायाम, कला व संगीत यातही यांना रुची असते. या राशी च्या व्यक्ती अष्टवधानी, बऱ्याच कलांमध्ये नेहमीच घोळक्यात असतात. याचं व्यक्तिमत्व हे एकदी बोलक आणि लोकांवर छाप पाडणार , आकर्षक असे असते. यांकडे नेहमी गप्पांचा खजिना असतो. नेहमी मुक्तपणे आणि सतत आनंद उधळत असतात.

मिथुन राशीचे पुरुष

खूप सुंदर जरी नसेल तरी त्यांचा व्यक्तिमत्व आकर्षक असते. कपड्याच्या बाबतीत मिथुन राशीचे पुरुष बेपवाह वागत्तात. त्याच्या कापध्याना इस्त्री असेल असे असा काहीच माही पण ते कोणत्याही प्रकारचे कपडे आणि कसेही घालतात आणि त्याचा पोशाख कसाही असल्याने त्यांच्या व्यकतीमात्वाकडे आकर्षले जाणारे खूप असतात. रुमाल वगरे अशी घेऊन येणे आणि त्याला नीट ठेवणे यांना जमल तर करतात. अस असल तरीही यांना स्वच्छ राशाण्याची आणि स्वच्छता तेवण्याची आवड असते आणि त्यान्या ऑफीस आणि घरात सुद्धा तसेच असतात.
मिथुन रास आणि यातील पुरुष हे एकदी वरवर बडबडे असतात. त्यंकडे पाहतातन अनेकां वाटते की हे खूप विसर भोले आणि अगदी अस्तावत्य राहणारे आहेत. पण याची माणस एकदी हुशार , आणि त्याबरोबर जिज्ञसु असतात. बर्याचदा सरळ फटकन बोलतात त्यामुळे समोरच्याचा अपमान करतात. हे एख्याद्या ८ ते १० वर्षाच्या मुलांनप्रमाणे खोडकर आणि निरागस असतात. त्यमुळे याच पोटात एक आणि ओठात एक असे नसते. व्यावहारिक वागताना हे खूप नीट आणि वागणे व बोलेने एकदी नीट असते तसेच झालेली चूक सुधारून गेऊन काम करतात. मिथुनची व्यक्ती कधीही वाकड्यात जाऊन काही काम करत नाही किवा त्यांना यावर विश्वास नसतो. तर ती आपली काम गोड बोलून करून घेतात.

मिथुन राशीच्या स्त्रिया

मिथुन राशीच्या स्त्रिया या अकदि रेदिओ सारख्या असतात सतत बडबड यांची चालून असते. याची बडबड म्हणजे एकदी कधीही न थाबणारी. या स्त्रिया एकदी मित्र किवा परिवार यामधील लोक्नाशी कितीही बोलू शकतात. यामुळे ते कधीच थकत नाहीत. घरातील काम काय मग करुं , बाकी दुसरी काम मग करू पण आधी आपण मित्र आणि बाकी मित्र परीवाराशी बोलून घेऊ. या राशीच्या स्त्रिया अश्या एकदी मित्र आणि यांच्या गोष्टी अडकलेले असतात. पण त्याचबरोबर या दिसायला सुद्धा एकदी सुंदर आणि आकर्षक असतात. या स्त्रिया मनात मोह निर्माण करतील एवढ्या सुंदर नसल्या तरी या एकदी हुशार आणि तरतरीत , चुणचुणीत असतात. या क्वचित कधी तरी चेहरा पाडून आणि मुरगळून बसल्या असे दिसत. या जरी रुसल्या तरी किवा यांनी अबोला दारला तरी यांचा काही तासात संपतो.
मिथुन राशीच्या स्त्रियांना अंहकार कमी असतो. काळानुसार याना बदलता येते. फावल्या वेळात या संगीत , कला वाचन , खेळ अश्या सर्व गोष्टी मध्ये लष्या देतात. बोलून एखादी वस्तू विकन आणि सेवा देन यांना छान जमत. यांना गप्पा मारण्याचा एवढा छंदकी त्याच्या पुढे कोणताही विषय असो ते बोलताना मग वेळ काळ विसरून जातात. तसेच यांना पाहुण्याच्या आदर तिथ्य करायला आवडते.

भाग्यरन्ते

मिथुन ही बुधाची व्दिस्वभाव रास आहे. त्यामुळे सतत बुद्धीप्रधान काम करत असतात आणि त्याच्यामुळे ताण हलका करण्यासाठी मोती, पाचू ही रत्ने वापरावी.

वृषभ राशी

राशीचक्रातील दुसरी रास म्हणजे वृषभ. या राशी चे प्रतीक म्हणजे बेल. ही रास एकदी ताकदवान आणि हुशार असते. या राशीच्या व्यक्ती एकदि धीम्या गतीने काम करतात. पण या मध्ये प्रचंड ताकद असते. या ताकदी मुळे काम करायची शमता जास्त असते . वृषभ ह्या राशीचा स्वामीराशी शुक्र असल्याने हे खूप तेजस्वि , शांत , कडक नजर, मोहक हास्य असे व्यक्तिमत्व असत्तात. या व्यक्ती दिसण्यास सुंदर असतात. यामध्ये रसिकपण, मोहकपण , विलासीपण जीवन आनंद ने जगण्याची आवड असते. वृषभ राशीच्या कृतिका नाशत्रचे २रा, ३ रा, व ४ था चरण , तसेच रोहिणी नश्त्राचे ४ था चरण व मृग चे पहिले व दुसरे चरण असे मिळून बनली आहे .

वृषभ राशीच्या स्त्री

वृषभ रास ही स्वामी शुक्र च्या प्रभाव खाली आहे त्यामुळे या स्त्रिया खूप सुंदर आणि हुशार असतात लांब सडक केस , मधुर हास्य , उंची उत्तम , भरदार बंध , आणि गोड नजर असते . याच्या जोडीला ते हुशार आणि जबाबदार असतात . याचा मुळे त्यांना एकदी काम करताना तसेच जीवन जगताना जास्त मेहनत कार्याची गरज पडत नाही. तसेच या स्त्रीया कपडे घालण्यात व नवनवीन कपडे घाण्याच्या गोष्टी मध्ये पुढे असतात. याचा एकदी प्रभाव हा मुलाला किवा नवरा याला जशी बायको पाहिज असते तसा पडतो.

वृषभ राशी पुरुष

वृषभ राशीचे पुरुष हे एकदी कामा मध्ये हुशार आणि दिसण्यास छान असे व्यक्तिमत्व असते. कामा मध्ये हुशार असल्याने ते एकदी कमी वेळात जास्त काम कार्टतात आणि त्याची सतत काम करण्याची इच्चा असते. यामुळे यान सतत बडती मिळत असते . हे पुरुष शरीराने ताकदवान आणि मोहक असतात. नजर कडक , उंची छान , भरदार मान यामुळे ते सतत चमकत असतात. आणी मित्रपरीवारामध्ये ते एकदी उमटून दिसत असतात . हे एकदी ताकदवान असले तरी सुद्धा कोणावर आधी त्रास देत नाही . पण यांना कोणी दिला तर त्याला सोडत नाही .

स्वभाव राशीचा.. गमतीजमती मानवाच्या..

बारा राशी या अतिशय मनोरंजक आहेत. प्रत्येक राशीचं एक वैशिष्ट आहे, सौंदर्य आहे. प्रत्येकाला स्वतःची रास माहित असेलच असे नाही, पण उत्सुकता नक्की असते. काही व्यक्तींशी आपले खूप छान सूर जुळतात, पण काही जणांशी बोलावससुद्धा वाटत नाही. मानवी मनाचा, भावनांचा अभ्यास बारा राशींच्या माध्यमातून केला आहे. कुठल्या राशीचे कुठल्या राशिशी जुळते, कुठल्या राशिशी अजिबात जुळत नाही, याचा मागोवा या पुढील भागात केला आहे. पती-पत्नी , सासू-सून, अधिकारी आणि हाताखाली काम करणारे कर्मचारी यांच्यातील संबंधांचा विचार प्रामुख्याने केला गेला आहे. शिवाय बालके, किशोरवयीन, वयस्कर मंडळी यांच्या स्वभावाने, वागण्याचे विश्लेषण केले आहे. पूर्णपणे त्या राशीच्या स्वभाव व वैशिष्टय मिळती जुळती व्यक्ती सापडणे कठीण आहे.

आज आपण मेष रास जाणून घेऊ…
राशी चक्रातील पहिली रास म्हणजे मेष. लढाऊ पवित्र्यातला मेढा.. हे या राशीचे बोधचिन्ह. आश्र्विनी, भरणी ही नक्षत्र पूर्ण म्हणजे चार चरण एकूण प्रत्येकी आणि कृतिका नक्षत्राचे पहिले चरण असे मिळून मेष रास बनते.
मंगळ जिचा स्वामी आहे अशी मेष रास लढाऊ वृत्तीची, जोमदार , उत्साही
धाडसी असणार यात नवल ते काय! तांबूस गौरवर्णी, काटक , चपळ शरीरयष्टी या राशीचा लोकांना लाभलेली असते..

मेष राशीच्या गमतीजमती...

अतिशय सुंदर , भरभक्कम, मोठे डोळे , काटक असतात. चपळ, नजर कडक यामुळे समोरील व्यक्तीच्या मनावर छाप पडते. शिस्तप्रिय , नवीन वेशभूषा, विविध रंगांची आवड असते.
खरेदीची आवड असल्याने दर्जेदार वस्तू विकत घेतात. जर नाही मिळाली तर

दुकानदारांच्या तोंडावर मारतात. घरच्या घोळक्यात रमतात.

खेळाची आवड असते. कलेची आवड असते. अन्याय सहन होत नाही. लढाऊ स्वभाव असतो. त्यामुळे बंद करतात.

हे पुरुष अगदी व्यवस्थित आणि काटक , ताकदवान असे असतात. त्यामुळे सगळे यांना घाबरून असतात. त्याचबरोबर असे व्यक्ती हे अधिक रागीटवृत्तीचे असतात. त्यामुळे यांना सांभाळून घेणे सहज सोपे नसते. त्यामुळे अशी माणसं ही देशप्रेमी आणि एखाद्याला अगदी सहज जीव लावणारी असतात.

एका प्रसंगात एक बाई लग्न करून नुकतीच घरी जाते आणि तिला घरचे नाव घ्यायला लावतात तर ती अगदी रागात एक नाव घेते…
सचिनला नमस्कार करते वाकून आणि
गणेशरावांचा नाव घेते चार गडी राखून….
अश्या गमती जमती मेष राशीच्या स्वभावात दिसून येतात..